करमाळा, प्रतिनिधी – श्री गणेश जयंती व विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने शहरातील सुतार गल्ली येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शनिवार दि.३१ रोजी सायंकाळी ६.३० पासून महाप्रसादाला सुरुवात होणार असल्याची माहिती नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

करमाळा शहरातील नवजवान सुतार तालीमला व्यायाम आणि कुस्तीची ऐतिहासिक परंपरा आहे. जुन्या पिढीतील अनेक नामवंत मल्लांनी नवजवान सुतार तालीम येथूनच आपल्या कारकिर्दीचा श्री गणेशा केलेला आहे. या तालीमच्या नावानेच सुतार गल्ली येथील गणेश मंडळाची स्थापना झालेली असून नवजवान सुतार तालीम तरुण मंडळा तर्फे गणेशोत्सवासह वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गेल्या सहा वर्षांपासून श्री गणेश जयंती व विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

श्री गणेश जयंती व विश्वकर्मा जयंती निमित्त महाप्रसादाचे यंदा सातवे वर्ष असून शहरातील नागरिकांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन महाप्रसादाचा लाभ घेण्याची विनंती नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

.

.

.

