करमाळा, प्रतिनिधी – शहरातील मोहल्ला गल्ली येथील माहेरा मोहसीन शेख या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीने गुरुवारी रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला आहे. कुटुंबातील आजी-आजोबा करत असलेला रोजा माहेराने स्वतःही करण्याचा हट्ट धरला आणि अगदी मोठ्या व्यक्तींप्रमाणे पवित्र रमजानचा पहिला रोजा तिने यशस्वी करून दाखवला आहे.

माहेरा हिचे वडील मोहसीन महिंद्रा फायनान्समध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात. वडील दैनंदिन कामात व्यस्त असले तरी लहानपणापासून आजोबा बाबासाहेब शेख आणि आजी नूरजहाँ शेख यांच्यासोबत वाढलेल्या माहेराला आपणही आजी-आजोबा प्रमाणे रोजा करावा अशी इच्छा झाली. यानुसार गुरुवार दि.१९ रोजीचा रोजा (उपवास) धरला आणि मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे दिवसभर अन्नपाणी वर्ज्य करून सायंकाळी इफ्तार नंतर रोजा सोडला.

माहेरा ही शहरातील नवभारत इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकत आहे. पहिलीतील या चिमुकली माहेराने तिचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल कुटुंबीयांसह आप्तेष्टांकडून तिच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

.

.

.

