करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या आणि शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती पद्मजा इंगवले-जगताप यांनी आपला वाढदिवस मतिमंद शाळेतील मुलांना खाऊ आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून साजरा केला आहे. याशिवाय रेल्वे स्टेशन, बस स्थानक या ठिकाणी असलेल्या गरजूंना ब्लॅंकेटचे वाटपही श्रीमती इंगवले यांनी केले आहे.
सामाजिक कार्यात शिवसेनेच्या धडाडीच्या महिला कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या श्रीमती पद्मजा इंगवले-जगताप यांनी त्यांचा दि. १ डिसेंबर रोजी असलेला वाढदिवस तालुक्यातील कोर्टी येथील ज्ञान प्रबोधन मतिमंद निवासी शाळेत मतिमंद मुलांबरोबर साजरा केला आहे. यावेळी त्यांनी शाळेतील मुलांना ब्लॅंकेट, खाऊ यांसह ५० किलो गहू आणि ५० किलो तांदूळ देखील दिला आहे. यासोबतच जेऊर रेल्वे स्थानक आणि बसस्थानक परिसरात असलेल्या गरजू व निराधारांनाही ब्लॅंकेटचे वाटप श्रीमती पद्मजा इंगवले यांनी केले आहे.
श्रीमती इंगवले यांच्या दातुत्वाबद्दल ज्ञान प्रबोधन विद्यालयाचे संचालक मोहित बागडे यांनी त्यांचे आभार मानून वाढदिवसानिमित्त सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी इंदुमती मेहेर, ललिता मेहेर, योगिता मासाळ, पुष्पा वायदंडे, सुनिता मेहेर, मंगल मेहेर, दादा रंधवे, संतोष वायदंडे, भीमा मेहेर यांच्यासह विद्यालयातील कर्मचारी वृंद उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने इतर अवांतर खर्च टाळून मी प्रबोधन मतिमंद निवासी शाळेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. माझ्याप्रमाणेच इतर सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय पुढार्यांनी या मतिमंद निवासी शाळेला मदत करणे गरजेचे आहे. -पद्मजा इंगवले-जगताप, जिल्हाध्यक्षा, शिवसेना महिला आघाडी.
.