March 9, 2026
IMG-20260118-WA0018(1)

करमाळा, प्रतिनिधी – समाज माध्यमांवर धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकल्याची माहिती मिळाल्यानंतर करमाळा पोलिसांनी तालुक्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयित दोघांपैकी एकजण अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबत शेलगाव (वां) येथील प्रशांत महादेव जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते गेल्या दोन वर्षांपासून बजरंग दलच्या गोरक्ष विभागाचे करमाळा तालुका उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. दि. ०२/०३/२०२६ रोजी रात्री ९.०० वाजण्याच्या सुमारास वांगी नं. २ येथील एका अल्पवयीन मुलासह तन्वीर रफिक तांबोळी (वय-२०) या दोघांनी त्यांच्या त्याचा इस्टाग्राम आयडी वरील स्टोरीवर औरंगजेबचा फोटो ठेवुन त्यामध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे डायलॉग ठेवले आहेत. या दोघांच्याही या पोस्ट सामाजीक भावना दुखावून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आहेत.

जगदाळे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केल्यानंतर तन्वीर तांबोळी याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *