March 1, 2026
IMG-20260102-WA0025

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा शहरातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि.४ रोजी प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती ज्ञानसेवा सोशल फाउंडेशनचे प्रा. महेश निकत यांनी दिली आहे. शहरातील गणेश नगर येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या समोरील प्रांगणात हे व्याख्यान होणार आहे.

याबाबत सविस्तर बोलताना प्रा. महेश निकत यांनी सांगितले आहे की, ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये स्थापनेपासूनच वर्षभर विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमांसोबत सुप्रसिद्ध व्याख्यात्यांचेही व्याख्यान दरवर्षी आयोजित करण्यात येते. यावर्षीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या परखड वाणीतून शालेय विद्यार्थ्यांना संस्काराची जाण करून देणारे प्रा. नितीन बानगुडे पाटील हे “चला संस्कारी पिढी घडवु या” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

रविवारी सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या व्याख्यानाचा लाभ विद्यार्थी, पालक यांच्यासह शहर व तालुक्यातील नागरिकांनी घेण्याचे आवाहन प्रा. महेश निकत यांनी केले आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *