March 1, 2026
IMG-20251215-WA0037

करमाळा, प्रतिनिधी – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) पंढरपूर विभागाची करमाळा शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व सोलापूर विभाग संयोजक ओम इंगळे यांनी जाहीर केलेल्या या कार्यकारिणीत करमाळा तालुका शहर मंत्री या पदावर पृथ्वीराज चिंतामणी जगताप यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

पृथ्वीराज जगताप हे शहरातील स्व. मदनदास देवी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्व असलेले तरुण नेतृत्व आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी दक्ष असल्याने तसेच त्यांचे संघटन कौशल्य उत्तम असल्याने त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. जगताप यांच्यासह करमाळा कार्यकारिणीच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर वंदेमातरम व भारत माता की जयच्या घोषणा देत आनंद व्यक्त करण्यात आला. आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे कार्य अधिक जोमाने व नियमानुसार संघटित पद्धतीने चालू राहील, असा आत्मविश्वास नवनियुक्त शहर मंत्री पृथ्वीराज जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.

या निवडीबद्दल भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्यासह दिग्विजय बागल, विद्या विलास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, जेष्ठ समाजसेवक डॉ. श्रीराम परदेशी, गणेश चिवटे, राहुल जगताप, सचिन पिसाळ, दीपक चव्हाण आदींनी पृथ्वीराज जगताप यांचे अभिनंदन केले आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *