March 1, 2026
राहुल जगताप

लोकप्रतिनिधीत्वासाठी मतदारांतून भैय्यांनाच पहीली पसंती

करमाळा, प्रतिनिधी – राज्यातील नगर परिषद निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांना प्रचार करण्यासाठी अल्पावधीचा वेळ मिळाला असला तरी करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या वतीने प्रभाग क्र. ५ (ब) चे उमेदवार राहुलभैय्या जगताप यांचा प्रचार मुदतपूर्व दोन दिवस अंतिम टप्प्यात आलेला आहे. प्रचारा दरम्यान प्रभागाचे लोकप्रतिनिधित्व भैय्यांकडेच असावे, अशी जनभावना अनुभवल्याचे राहुलभैया जगताप यांनी सांगितले आहे.

यावेळी सविस्तर बोलताना राहुलभैय्यांनी सांगितले की, केवळ निवडणुका आल्या म्हणून उमेदवारांना मतदार आठवतात. मात्र प्रभागातून 2006 ते 2011 या कालावधीसाठी नगरसेवक असताना सामान्य मतदारांच्या मागणीला अनुसरून त्या कारकिर्दीत शहरातील शाहूनगर आणि बारा बंगले परिसराचे डांबरीकरण आणि या दोन्ही ठिकाणी नाना-नानी पार्क, जुना रिंग रोड परिसरातील झोपडपट्टी नियमित करणे, रेणुका नगर मध्ये पाणी आणि लाईटची सोय, कुरेशी गल्लीमध्ये हातपंप आदी लोकोपयोगी कामे पूर्णत्वास नेली. यानंतर विकास कामे होतच राहतील, अशा अपेक्षेने आणि स्वतःच्या व्यवसायकडे लक्ष केंद्रित केले होते.

मात्र 14 वर्षांनंतर प्रभागाची सद्यस्थिती पाहता प्रभागातील अनेकांनी राहुलभैया यांना पुन्हा नगरपालिकेकडे लक्ष देण्याची विनंती केली. त्यामुळे जनभावनेचा आदर करून आमच्या नेत्या तथा भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मीदीदी यांच्याकडून उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे दीदींनी इच्छुकांच्या यादीत नाव घेतले असले तरी प्रभागातील पूर्वीची कारकिर्द लक्षात घेऊन पक्षाने प्रभागाची जबाबदारी सोपवली असल्याचे राहुलभैया यांनी सांगितले.

निवडणुकीत उतरल्यानंतर औपचारिकता म्हणून प्रभागात प्रचार करत असताना नागरिकांनी प्रभागातील रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य यांसह सार्वजनिक शौचालय, महावीर उद्यानाची दुरुस्ती, नादुरुस्त हात पंप आदी समस्या प्रचारादरम्यान मतदारांनी मांडल्या आहेत. भाजपाकडून उमेदवारी असल्याने तसेच लोकप्रतिनिधीत्वाचा विचार करता सहज संपर्क करता येणे शक्य असल्याने या सर्व समस्या राहुलभैय्यांच्या हातूनच सोडवल्या जाण्याचा विश्वास मतदारांनी यावेळी दिला आहे.

प्रभाग क्र. ५ चा विचार करता या प्रभागात अठरापगड समाजाचे लोक आहेत. जातीय समीकरणापेक्षा काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची इथे आवश्यकता आहे. तालुक्याचे वरीष्ठ स्तरावरील लोकप्रतिनिधित्व विरोधी बाकावर असताना करमाळा नगरपालिकेला विकास कामांचा निधी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे प्रयत्नशील असणार आहेत. यासोबतच स्थानिक स्तरावर रश्मी दीदी बागल, दिग्विजय भैय्या बागल विलासरावजी घुमरे मिलिंद फंड गणेश चिवटे, कन्हैया लाल देवी, अतुल फंड महादेव फंड यांच्यासह आमचे ज्येष्ठ बंधू चिंतामणी दादा यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत असून भाजपाच्या सर्व प्रभागांच्या नगरसेवक पदासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुनीताभाभी देवी यांचा विजय निश्चित असल्याचे राहुलभैया यांनी शेवटी सांगितले आहे.

शांत, संयमी स्वभाव असला तरी राहुलभैय्यांचे व्यक्तिमत्व करारी आहे. जीवनमानाला सामाजिक कार्याची किनार असावी म्हणून राहुल भैयांचे सामाजिक कार्यात योगदान मोठे आहे. आधीच्या कारकिर्दीत त्यांनी केलेली कामे पाहता सामान्य मतदार राहुलभैयांच्या पाठीशी असून प्रभागातून प्रचाराच्या तीन फेऱ्या केल्यानंतर आता मतदारच आमच्याकडे येऊन राहुलभैया यांना निवडून आणणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत.
-चिंतामणी (दादा) जगताप,
माजी उपसभापती, कृ.उ.बा. समिती, करमाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *