करमाळा, प्रतिनिधी – लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी करमाळा तालुक्यातील तत्कालीन ग्राम महसूल अधिकाऱ्यावर (तलाठ्यावर) करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावामध्ये जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ दरम्यान हा प्रकार घडला आहे.

याबाबत ३५ वर्षीय पिडीतेने दि.१९/०१/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जानेवारी २०२४ ते दि.१६/१२/२५ या कालावधी दरम्यान आरोपी कल्याण मनोहर स्वामी (सध्या रा. एस.टी. कॉलनी, करमाळा, मुळ रा. लातुर) यांनी पिडीता ही मागासवर्गीय असल्याचे माहीत असताना तिला लग्न करण्याचे आमिष दाखवुन वेळो वेळी तिच्या इच्छेविरूध्द तिच्या राहत्या घरासह खराडी (पुणे) व टेंभुर्णी येथे तिच्याशी शारीरीक संबंध करून तिच्यावर बलात्कार केला.

पिडीत महीलेच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी आरोपी कल्याण मनोहर स्वामी याच्या विरुद्ध अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ च्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

.

