करमाळा, प्रतिनिधी – करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात इच्छुकांचे अर्ज मोठ्या संख्येने दाखल झाले होते. छाननी नंतर मंजूर अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली असून बुधवारी चौघांनी तर गुरुवारी १९ जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिये दरम्यान रविवारी ही अर्ज स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी चे तब्बल २६९ अर्ज दाखल होऊन मंगळवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत सर्वच्या सर्व मंजूर झाले होते. यापैकी कोणत्याही अर्जावर आक्षेप आलेला नव्हता. बुधवारपासून अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली. बुधवारी विविध प्रभागातील चौघांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर गुरुवारी १९ जणांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहेत. यामध्ये सौ. संगीता श्रेणिक खाटेर यांच्या नगराध्यक्षपदाच्या अर्जासह इतर १८ नगरसेवक पदाच्या इच्छुकांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहेत.

निवडणूक कार्यक्रमा नुसार आज शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून नगरपालिकेचा गड राखण्यासाठी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि करमाळा शहर विकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवाराकडून काय निर्णय घेतला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

.

.

.

.

.

