March 1, 2026
IMG-20251111-WA0058

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील बहुप्रतिक्षित रिटेवाडी उपसा सिंचन योजने संदर्भात आज मंगळवार दि.११ रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी या योजनेशी संबंधित WAPCOS या संस्थेच्या सर्वेनुसार सबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक पावले उचलण्याचे आदेश त्यांनी दिले. सरकार या योजनेबाबत सकारात्मक असून ही योजना मार्गी लागण्याच्या वाटेवरील हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे प्रतिपादन भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी केले आहे.

मंगळवारी मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दालनात
ही बैठक संपन्न झाली. रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या पूर्ततेसाठी करमाळा तालुक्यातील शेतकरी आग्रही आहेत. या योजनेचा फायदा तालुक्यातील चाळीस गावांना याचा लाभ होणार आहे. करमाळा तालुक्याला कुकडीचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळण्यासाठी टेल टू हेड पद्धतीने पाणी दिले जाईल. त्याच बरोबर अस्तरीकरणाचेही काम केले जाईल असे ना. विखे पाटील यांनी या बैठकीत सांगितल्याचे बागल यांनी सांगितले आहे.

कुकडीचे पाणी, जलसंपदा मंत्री अन् स्व. दिगंबरराव बागल यांची आठवण !

यावेळी कुकडीच्या योजनेसंदर्भात जलसंपदा मंत्री ना. विखे पाटील यांनी माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांनी आपल्याकडे आग्रह केला असता स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी आदेश दिले व सदरील योजना हाती घेण्यात आली, असा आवर्जून उल्लेख ना. विखे पाटील यांनी यावेळी केला.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *