March 1, 2026
IMG-20251203-WA0050(1)

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.

यावेळी संविधानाचे रचिते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळेच्या सर्वेसर्वा सुनीता देवी व मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये संविधानाचे महत्त्व नागरिकांची कर्तव्य व भारतीय लोकशाही यावर जनजागृती करण्यात आली. या दिवशी सविता बागल यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे हक्क जबाबदाऱ्या आणि कर्तव्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावले. शाळेत विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागृती म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला होता.

याच दिवशी 26 /11 चा हल्ला झाला होता त्यामुळे या हल्ल्यात मृत झालेल्या सर्व अधिकारी तसेच नागरिकांना श्रद्धांजली ही वाहिली गेली. या उपक्रमा अंतर्गत संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. अशाप्रकारे या दिवशी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *