संदीप कांबळे यांना प्रभाग क्र. १० ची उमेदवारी !!!
करमाळा, प्रतिनिधी – सोमवारी प्रभाग क्रमांक ५ मधील अमोल परदेशी यांच्या सावंत गटातील प्रवेशानंतर मंगळवारी सायंकाळी शहरातील सिद्धार्थनगर भागातील जितेश कांबळे आणि संदीप कांबळे हे समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत सावंत गटाच्या करमाळा शहर विकास आघाडीत दाखल झाले आहेत. यावरून नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागांतून पूर्ण पॅनल देण्याच्या तयारीत उतरलेल्या सावंत गटाला सर्वसामान्यांची पसंती असल्याचे दिसून येत आहे.

सावंत गल्ली परिसरातील दोन प्रभागांमध्ये सावंत गटाचे कायम वर्चस्व राहिले आहे. माजी नगरसेवक संजय सावंत हे सावंत गटातून नगरपालिकेचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांच्या कामावर या प्रभागातून समाधान दिसून आलेले आहे. मागील काही वर्षांचा विचार करता करमाळा नगरपालिकेवर जगताप गटाचे अधिपत्य दिसून येते. कार्यकाळ संपल्यामुळे करमाळा नगरपालिकेवर २०२१ पासून प्रशासक राज सुरू आहे. मात्र या कालावधीत जनतेला पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि इतर अनेक बाबतींत समस्यांना तोंड द्यावे लागलेले आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या कारभारावर सामान्य जनता नाराज दिसून येत आहे. ही नाराजी मतांमध्ये परिवर्तीत करण्यासाठीच सावंत गटाने पूर्ण ताकतीने करमाळा नगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. सावंत गटात शहराच्या विविध भागांतून होणारे जोरदार इनकमिंग पाहता सावंत गटाचा निर्णय पूर्णत्वास जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मंगळवारी सायंकाळी शहरातील सिद्धार्थनगर भागातील जितेश कांबळे आणि संदीप कांबळे यांनीही देवा लोंढे, अनिल कांबळे, मुकेश भोसले, उमेश कांबळे, नामदेव कांबळे, मयूर शिंदे, सूर्यकांत शिंदे, नितीन खरात, अण्णा कांबळे, रमेश कांबळे, अश्विन कुमार कांबळे, दादा कांबळे, राजू कुंभार, पप्पू दामोदरे, युवराज भोसले, चव्हाण मिस्त्री, केशव कांबळे, योगेश कांबळे, आदित्य कांबळे, राहुल जाधव, किरण जाधव, अनिल जाधव, शहाजी ठोसर, प्रवीण गायकवाड, पिंटू ठोसर, कालिदास पवार, गणेश कारंडे, फैजल शेख, सलीम शेख, प्रभू कांबळे, नाना कांबळे, किशोर ताकतोडे आदींना सोबत घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत सावंत गटात प्रवेश केला. यावेळी प्रभाग क्रमांक १० मधून सावंत गटाच्या वतीने संदीप कांबळे हे नगरसेवक पदाचे उमेदवार असल्याचे सुनील सावंत यांनी जाहीर केले.

करमाळा नगरपालिका निवडणुकीत इतर राजकीय गटांमध्ये अद्याप उमेदवारांची चाचपणी सुरू असताना करमाळा शहर विकास आघाडी मध्ये धडाधड होणारे प्रवेश आणि त्यांतून जाहीर होणाऱ्या उमेदवाऱ्या पाहता शहरातील जनता शहराच्या विकासासाठी सावंत गटाला विश्वास पात्र समजत असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या विकासात परिवर्तन घडवू इच्छिणाऱ्या शहरातील इतर प्रभागांतील घटकांनीही करमाळा शहर विकास आघाडी मध्ये सामील होण्याचे आवाहन सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांनी यावेळी केले आहे.

.

.

.

.
.
