March 1, 2026
IMG-20260108-WA0040

करमाळा, प्रतिनिधी – श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणातील योगदानाचे स्मरण करत विद्यार्थ्यांनी त्यांना अभिवादन केले.

शाळेच्या सर्वेसर्वा सुनीता देवी व मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सविता बागल यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केल्यानंतर विद्यार्थ्यांसह शाळेच्या शिक्षिका दिपाली शहाणे, स्वाती काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

सौ. सुनीता देवी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सावित्रीबाईंनी शिक्षणासंबंधी केलेल्या कार्याची महती सांगून विद्यार्थिनींना बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी सर्व स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *