करमाळा, प्रतिनिधी – करमाळा तालुक्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अग्रेसर असलेल्या ‘करमाळा तालुका पत्रकार संघ (सक्रिय)’ ची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या निवडीत अनुभवी आणि अभ्यासू पत्रकारांचा समावेश करून सर्वसमावेशक टीम तयार करण्यात आली असून, अध्यक्षपदी शितलकुमार मोटे यांची तर उपाध्यक्षपदी प्रफुल्ल दामोदरे यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणी नूसार ज्येष्ठ सल्लागार व मार्गदर्शक म्हणून ॲड. डॉ. बाबुराव हिरडे, जयंत दळवी, आलिम शेख, अशपाक सय्यद आणि किशोरकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ कार्य करणार आहे. संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सिद्धार्थ वाघमारे, प्रवक्ते पदी आण्णासाहेब काळे, सचिवपदी ॲड. विशाल घोलप, सह सचिव पदी ॲड. सचिन हिरडे, प्रसिद्धी प्रमुखपदी राजाराम माने, संघटकपदी शेखर स्वामी तर संपर्क प्रमुखपदी नाना पठाडे आणि संजय चौगुले यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली आहे.

या संघटनेत सदस्य म्हणून विशाल परदेशी, राजेश गायकवाड, उमेश पवळ, गणेश जगताप, अंगद भांडवलकर, हर्षवर्धन गाडे, गजेंद्र पोळ, सुनील भोसले, विजय निकत, जयंत कोष्टी, धर्मराज दळवे, प्रशांत भोसले, प्रवीण अवचर, गौरव मोरे, सुयोग झोळ, अतुल बोकन, हरिभाऊ हिरडे, दस्तगीर मुजावर, नंदकुमार वलटे, संजय जाधव, बाळासाहेब सरडे, धनंजय निर्मळ आणि रणजीत शिंदे यांचा समावेश आहे.

आजच्या काळात पत्रकारांसमोर अनेक आव्हाने आहेत. ग्रामीण भागातील पत्रकारांना संरक्षण मिळवून देणे आणि त्यांच्या कौटुंबिक व सामाजिक अडीअडचणीत संघ खंबीरपणे पाठीशी उभा राहील. सर्वांना सोबत घेऊन संघटनेचे कार्य अधिक विस्तारण्याचा आमचा मानस आहे.
-शितलकुमार मोटे,
अध्यक्ष, करमाळा तालुका पत्रकार संघ (सक्रिय)

पत्रकारिता हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी हा संघ ‘सक्रिय’ भूमिका बजावेल. तरुण आणि अनुभवी पत्रकारांच्या या फळीमुळे तालुक्यात नवीन वैचारिक चळवळ उभी राहील.
-प्रफुल्ल दामोदरे (उपाध्यक्ष)

या निवडीचे करमाळा तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले असून नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

