March 1, 2026
IMG-20260108-WA0059

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा विकास आघाडी (सावंत गट)च्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत यांनी बुधवारी करमाळा नगरपालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने स्वीकृत नगरसेवक पदासाठी सिध्देश सुधाकर लावंड यांचा अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती करमाळा शहर विकास आघाडीकडून देण्यात आली आहे.

करमाळा नगरपालिकेच्या 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सावंत गटांनी करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर (काका) लावंड यांनी करमाळा शहर विकास आघाडीला पाठिंबा दर्शविला होता. शहर विकास आघाडीच्या प्रचारात पै. सुधाकर काका लावंड यांच्यासह त्यांचे सुपुत्र सिद्धेश लावंड यांनीही सक्रिय सहभाग घेतला होता. गुरुवारी करमाळा विकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सिध्देश लावंड यांचा स्वीकृत नगरसेवक पदाचा नामनिर्देश अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी नगर विकासचे प्रशासन अधिकारी डोके साहेब, सावंत गटाचे नेते सुनील (बापू) सावंत, करमाळा नगरपरिषदेचे नगरसेवक संजय (आण्णा) सावंत, सुधाकर (काका) लावंड, दादासाहेब इंदलकर, अमोल परदेशी, विनोद महानवर, भैय्या राठोड, चेतन भोगल, सुहास शिंदे उपस्थित होते.

.
.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *