March 9, 2026
IMG-20260302-WA0030

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्याचे सुपुत्र शहीद जवान नवनाथ गात यांच्या तेवीसाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला वरकुटे येथे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता उत्साहात सुरुवात झाली. जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते रक्तदान संकलन वाहनाचे पूजन करून या शिबिराचे उद्घाटन झाले.

वरकुटे परिसरातील महिला वर्गाने या रक्तदान शिबिरात स्वेच्छेने सहभागी होत प्रत्यक्ष रक्तदानाला सुरुवात केली. वरकुटे गावातील शहीद जवान नवनाथ गात स्मारक येथे हे शिबिर सोमवारी दुपारपर्यंत सुरू राहणार आहे. करमाळा शहरातील श्री कमला भवानी ब्लड बँकेकडून या रक्तदान शिबिराचे रक्त संकलन केले जाणार आहे.

शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सर्वांनी रक्तदान करण्याचे तसेच यावेळी आयोजित किर्तन आणि सन्मान सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन शहीद जवान नवनाथ गात स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *