करमाळा, प्रतिनिधी – करमाळा नगरपरिषद आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत (करमाळा) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त सखी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.९ ते बुधवार दि.११ पर्यंत (दुपारी १ ते ४ या वेळेत) असे तीन दिवस होणाऱ्या या मेळाव्यात महिलांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

सोमवार दि.९ रोजी संगीत खुर्ची आणि बकेट मध्ये बॉल टाकणे अशा दोन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. मंगळवारी पाककृती आणि उखाणे स्पर्धा होणार आहेत. बुधवारी सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण समारंभाने या मेळाव्याची सांगता होणार आहे. वरील प्रत्येक स्पर्धेमधून प्रथम तीन विजेते निवडण्यात येतील व विजेत्यांना आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणाऱ्या महीलांना आकर्षण भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

शहरातील एस टी स्टँड समोरील विकी मंगल कार्यालयात हे कार्यक्रम होणार असून या मेळाव्यात करमाळा शहरातील महिलांनी आपल्यातील कलागुणांना वाव देव्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करमाळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीमती. निर्मलाताई गायकवाड आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत (करमाळा) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या मेळाव्यातील स्पर्धांसाठी इच्छुक असलेल्या महिलांनी नाव नोंदणीसाठी तुषार टांकसाळे (मो.९९६०२३६५७१), अश्विनी जाधव (मो. ७९७२८४७२०९), शितल बहाड (मो.९१७२४२३३५१), सुप्रिया पालखे (मो.७९७२६५०५०८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी केले आहे.

.

.

