करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथील घटना
करमाळा, प्रतिनिधी – शेतात मजुरीने काम करणाऱ्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ आणि विनयभंग करून तिच्यासह सोबत काम करणारा पती, शेतमालकाचा मुलगा आणि इतर महिलांना मारहाण करण्यात आली आहे. करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे ही घटना घडली आहे.

याबाबत २५ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१०/०१/२६ रोजी सकाळी ती, तिचा पती आणि इतर दोन महिला शेतमालकाच्या मुलासह ज्वारीचे बाटुक काढण्याचे काम करीत होते. यावेळी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी सुहास सुरेश तळेकर (रा. केम, ता. करमाळा) याच्यासह एक महिला व एक इसम तेथे आले व “तुम्ही आमचे शेतात का आलात? तुम्ही शेताचा उतारा दाखवा” असे म्हणुन त्यांच्या हातातील कु-हाड, विळा, काठीने त्यांना मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली व पिडीतेच्या गळ्यातील काळ्या मण्यातील डोरले तोडुन टाकले. तसेच पिडीतेच्या अंगाला हात लावुन धक्काबुक्की केली व जातिवाचक शिवीगाळ करून “पुन्हा आमच्या रानात आली तर तुला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिली.

पिडीतेच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी सुहास सुरेश तळेकर (रा. केम, ता. करमाळा) व त्याच्यासोबत असलेली महिला व अनोळखी इसमाविरुध्द अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ च्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४ सह विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्हि. एस. या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.
