April 13, 2026
IMG-20260323-WA0070

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील घारगाव येथे श्री काळभैरवनाथ देवाची जंगी यात्रा सालाबाद प्रमाणे उत्साहात साजरी होणार आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार दि.२६ मार्च ते मंगळवार दि. ३१ मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या या
यात्रेची सुरुवात गुरुवारी रात्री १२ वाजता श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी लग्न सोहळ्याने होणार आहे. शुक्रवारी रात्री ९ ते १२ या वेळेत सौ. शीतलताई पुणेकर यांच्या जय मल्हार जागरण गोंधळ पार्टीच्या गोंधळ गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

यानंतर शनिवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत गावात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. रविवारी रात्री ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. रणजित (बापू) महाराज यांचे कीर्तन होणार आहे. सोमवारी पहाटे ५ वाजता देवाची छबीना (मिरवणूक) काढण्यात येणार असून रात्री दत्ता महाडिक (नारायणगावकर) यांचा लोकनाट्य तमाशा सादर केला जाणार आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान रंगणार आहे.

या सर्व कार्यक्रमांसाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन घारगाव ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *