April 11, 2026
IMG-20260402-WA0002(1)

राहते घर नावावर करून घेऊनही मुद्दल व व्याजासाठी महिला सावकाराची दमदाटी व शिवीगाळ

करमाळा, प्रतिनिधी – व्याजाने घेतलेल्या दहा हजार रुपयांचे सात लाख रुपये देऊनही मुद्दल व व्याजापोटी साडे पाच लाखांची बाकी दाखवून विधवा महीलेचे राहते घर खाली करण्यासाठी जेऊर येथील सावकार सासू व तिच्या सुनेने तगादा लावला आहे. याच तगाद्यातून कर्जदार महीलेला दमदाटी, शिवीगाळ व धमकी दिली जात असल्याने तिने पोलिसांत धाव घेतली आहे.

याबाबत खाजगी सावकारीच्या पाशात अडकलेल्या जेऊर येथील सुषमा विजय वनकळस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०१९ मध्ये त्यांनी गावातील रुक्मीणी किसन माने यांच्या कडून १०,००० रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. यानंतर व्याजास व्याज लावून त्यांनी फिर्यादी वनकळस यांच्याकडुन आत्तापर्यंत ७ लाख रुपये घेतले. तसेच व्याजाच्या पोटी फिर्यादीचे जेऊर येथील राहते घर दि.०८/०७/२० रोजी लिहुन घेतले. ही घर जागा त्यांची सुन पुजा सागर माने हीच्या नावे करुन घेतली व फिर्यादीला परत ७ टक्के दराने बेकायदेशीरपणे व्याज आकारुन आतापर्यंत ५,५०,००० रुपये फिर्यादीकडे मुद्दल व व्याज राहीलेले असल्याचे सांगून “व्याजाचे पैसे दे, नाहीत घर खाली कर” असे म्हणुन फिर्यादीला व्याजाचे पैशासाठी तगादा लावून वारंवार घरी येवून दमदाटी, शिवीगाळ व धमकी दिलेली आहे. तसेच सागर माने हीची बहीण पुनम हीने फिर्यादी कडून व्याजापोटी दिड लाख रुपये घेऊन घराचा व्यवहार मिटविण्या करीता नोटरी केली आहे.

वनकळस यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी रुक्मीणी किसन माने, पुजा सागर माने, सागर किसन माने व पुनम (पुर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम ४५ व ३९ आणि भारतीय न्याय संहीता २०२३ च्या कलम ३(५), ३५२ आणि ३५१(२) नूसार गुन्हा दाखल केला असून करमाळा पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *