एस कार्तिकेयन सोलापूरचे नवे कलेक्टर
सोलापूर, प्रतिनिधी – जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्याचा कारभार यशस्वीपणे हाताळलेले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी एस कार्तिकेयन हे आता सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

कुमार आशीर्वाद हे २०१६ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. २२ जुलै २०२३ पासून ते सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत होते. सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना अनेक त्यांनी नेहमीच विकासकामांचा आढावा घेतला. गेल्या वर्षी दिवाळीच्या दरम्यान सीना नदीला आलेल्या पुर परिस्थितीसह विविध नैसर्गिक आपत्ती आणि प्रशासकीय घडामोडी त्यांनी पद्धतशीरपणे हाताळत एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्यात आपली छाप उमटवली आहे.

कुमार आशीर्वाद यांच्या जागी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांची सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. एस कार्तिकेयन हे २०१४ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्यापूर्वी त्यांनी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये केलेल्या सुधारणांसाठी विशेषतः मुलींच्या स्वच्छतागृहांच्या कामासाठी त्यांची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.

.

.

.

.

