May 6, 2026
IMG-20260415-WA0064

करमाळा, प्रतिनिधी – दरवाजा बंद करून घरात झोपले असता तिघा चोरट्यांनी दरवाजाची कडी-कोयंडा तोडून कोयत्याचा धाक दाखवत वृद्ध इसमाच्या खिशातील रोकड आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र असा एकूण ६९ हजाराचा ऐवज लुटून पोबारा केला. ही घटना तालुक्यातील गौंडरे येथे रविवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी मधुकर नामदेव मांडरे (वय-७३, रा. गौंडरे) यांनी करमाळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते शनिवारी रात्री जेवण करून घरात झोपले होते. पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात तिघा जणांनी आतून बंद असलेल्या दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील रोख ५ हजार रुपये तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लुटून पसार झाले.

मांडरे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी अनोळखी तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!