करमाळा, केत्तूर रवी चव्हाण – तालुक्यातील मांजरगाव येथील भीम अनुयायी रमेश (आण्णा )भानुदास खरात यांचे दि.६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
रमेश खरात यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे साखर टेंडर मुकादम म्हणून अनेक वर्ष काम पाहिले. त्यांच्या निधनाने मांजरगाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर बुधवारी सायंकाळी पाच वाजता मांजरगाव येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मांजरगाव ग्रामपंचायत मा. सदस्य तानाजी खरात यांचे ते वडील होत.
