June 21, 2026
IMG-20260513-WA0077

करमाळा, प्रतिनिधी – शहराच्या माजी उपनगराध्यक्षा श्रीमती सुमित्रा (अक्का) बाळासाहेब घोलप (वय-८१ ) यांचे आज बुधवार दि.१३ रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. करमाळा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या सभापती सौ. लता विजय घोलप यांच्या त्या सासूबाई होत.

श्रीमती घोलप यांनी नगरसेविका तसेच उपनगराध्यक्षा म्हणून कार्य करताना शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. धार्मिक वृत्ती, मायाळू स्वभाव आणि दयाळूपणा यामुळे त्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण झाली होती. सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याच्या वागणुकीमुळे त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये आदराची स्थान होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर करमाळा शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

उद्या गुरुवार दि. १४ रोजी सकाळी ९ वाजता घोलप नगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून शहरातील विकासनगर येथील दत्त मंदिराच्या पाठीमागील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

श्रीमती घोलप यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शहरातील व्यवसायिक नितीन घोलप, संतोष घोलप व विजय घोलप यांच्या त्या मातोश्री होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!