करमाळा, प्रतिनिधी – प्रा.डॉ. निकत सरांच्या ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट (करमाळा) मधील शिवांजली घाडगे व विराज पोते या दोघांनी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत भरघोस गुण मिळवले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेतील या यशामुळे या दोघांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.

तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मधून ५ विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. त्यांपैकी शिवांजली घाडगे हीने १५० तर विराज पोते याने या परीक्षेत १३८ गुण मिळवले आहेत. या यशामुळे शिवांजली आणि विराज हे दोन्ही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत.

संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. महेश निकत यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवांजली व विराज यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले असून या दैदीप्यमान यशामुळे या दोघांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

.

.

.

.

