June 19, 2026
1779203810632

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील गुरुकुल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत यशाची चमकदार कामगिरी केली.

इयत्ता पाचवीमध्ये तेजस्विनी सुनील शिंदे हिने 266 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासोबतच जय राजेंद्र भंडारे (262 गुण), आरोही निलेश पाटील (244 गुण), युद्धवीर हनुमंत नलवडे (242 गुण), संस्कार मंगेश फंड (238 गुण), राजवीर संतोष घाडगे (234 गुण), ओम अक्षय काटूळे (200 गुण), रेणुका उत्तमराव भोगे (198 गुण) व अथर्व हरिदास मोरे (194 गुण) यांनीही कंसात दाखवलेले गुण प्राप्त करून उल्लेखनीय यश मिळविले आहे.

तसेच इयत्ता आठवीमध्ये वरद जयंत देशमुख याने 222 गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे. यासोबतच वरूण भाऊ मस्तुद (214 गुण), हार्दिक दीपक निळ (212 गुण), संग्राम गौतम रोडे (206 गुण), समृद्धी गणेश जगदाळे (202 गूण), करण रेवणाथ वळेकर (194 गुण), पिहू रोहन मुसळे (184 गुण) व सोनाक्षी सचिन गायकवाड (180 गुण) यांनीही कंसात दाखवलेले गुण मिळवत यश संपादन केले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना सरडे मॅडम, नायकुडे मॅडम, भगत मॅडम, आव्हाड सर, वाघमारे सर व सातव सर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष नितीन भोगे, सचिवा रेश्मा भोगे यांनी विशेष अभिनंदन केले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!