प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि समाजहिताची जाणीव ठेवून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल
करमाळा, प्रतिनिधी – शिर्डी येथील बी दि चेंज फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा “महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार” यावर्षी जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सौ. रुक्मिणी गणेश माने-सस्ते यांना देण्यात आला आहे. रविवार दि.१७ रोजी शिर्डी येथील पार पडलेल्या भव्य सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

शासन, प्रशासन व सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे, कर्तव्यनिष्ठेने आणि समाजहिताची जाणीव ठेवून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सौ. रुक्मिणी माने या निवृत्त रेल्वे कर्मचारी रामलिंग सस्ते यांच्या कन्या तर सहाय्यक कृषी अधिकारी गणेश माने यांच्या सुविद्य पत्नी आहेत. कार्यतत्पर, सेवाभावी वृत्ती आणि उत्कृष्ट प्रशासनिक कामकाजामुळे त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे.

शिर्डी येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सौ. रुक्मिणी माने-सस्ते यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

.

.

.

.

