July 28, 2026
IMG-20260708-WA0016(1)

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी – पत्नीचा माहेरचा हिस्सा घेण्याचा वाद मिटवण्यासाठी पत्नीला माहेरी घेऊन गेल्यानंतर तिच्याशी संपर्क न झाल्याने तिला शोधण्यासाठी आलेल्या पतीला तिघांकडून मारहाण करण्यात आली आहे. तालुक्यातील भाळवणी येथे ही घटना घडली आहे.

याबाबत नवनाथ आप्पा करांडे (वय-५६ वर्षे रा. धानोरा ता. जामखेड जि. अहिल्यानगर) यांनी दि. ०५/०७/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.३०/०६/२६ रोजी दुपारी २ वाजता ते भाळवणी (ता. करमाळा) येथे पत्नी ज्योती हिला आणण्यासाठी संभाजी दादासाहेब गाडे यांचे घरी गेले होते. त्याठिकाणी सुनिल गाडे, उत्तम वाघमारे व बाबासाहेब गाडे यांचा मुलगा (नाव माहित नाही) यांनी फिर्यादीच्या पत्नी ज्योती यांच्याशी जमिनीचा न्यायालयात वाद सुरू असल्याचा राग मनात धरून ‘तु इथे कशाला आला आहेस, तुझे इथे काय काम आहे’ असे म्हणुन शिवीगाळ, दमदाटी करत फिर्यादी करांडे यांना काठी, दगड व लाकडी फळीने मारहाण करुन गंभीर जखमी केले तसेच फिर्यादीला ‘तु पुन्हा इथे आला तर तुला जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी दिली.

करांडे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी सुनिल दादासाहेब गाडे, बाबासाहेब गाडे यांचा मुलगा (नाव माहित नाही) (दोघे रा. भाळवणी ता. करमाळा) आणि उत्तम वाघमारे (रा. निंभोरे ता. करमाळा) या तिघांविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार विठ्ठल पठाडे हे या गुन्हयाचा अधिक तपास करत आहेत.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!