करमाळा, प्रतिनिधी – परिशिष्ठ एच प्रवर्गात मोडणाऱ्या आणि डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय विक्री करणे बंधनकारक असलेली औषधे बाळगणाऱ्या एकाला करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे एकच्या सुमारास शरद विष्णु शिंदे (वय-२८ वर्षे, रा. शेलगाव (क), ता. करमाळा, जि. सोलापुर) हा करमाळा शहरातील राशिन रस्त्यावर ट्रॉईका कंपनीच्या मेफेटर्माईन सल्फेट नावाच्या प्रत्येकी ३३४.४० रुपये किंमतीच्या ५ नगांच्या १० बॉक्स मधुन एकुण रक्कम रुपये १६,७२० किंमतीच्या ५० बाटल्या अवैधरित्या बाळगताना आढळून आला. या कारवाई पोलिसांनी इंजेक्शन्स सह शिंदे यांच्याकडील मोटार सायकल आणि मोबाईल फोन असा एकूण १,०६,७२० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

करमाळा पोलिसांनी शरद शिंदे याच्याविरुध्द भारतीय न्याय संहीता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक संदीप बनकर हे या गुन्हयाचा अधिक तपास करत आहेत.

.

.

.

.

.

