August 5, 2026
IMG-20260805-WA0032

करमाळा, प्रतिनिधी – संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७६व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त करमाळा शहरातील श्री शिंपी समाजाच्या वतीने बुधवार दि. ५ ऑगस्ट ते मंगळवार दि. ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील खडकपुरा भागातील शिंपी समाज पंचाचा वाडा येथे हा धार्मिक सोहळा सुरू आहे.

या सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ९ ते ११ या वेळेत श्री नामदेव गाथा पारायण, दुपारी ३ ते ५ भजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, तसेच सायंकाळी ७ ते ९ या वेळेत कीर्तन व त्यानंतर हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. या सप्ताहात बुधवार दि. ५ रोजी ह.भ.प. राजेंद्र महाराज भोसले (कंदर), गुरुवार दि. ६ रोजी ह.भ.प. रोहिणीताई महाराज गाडेकर (नान्नज), शुक्रवार दि. ७ रोजी ह.भ.प. विवेकानंद महाराज मंजरतकर (जामखेड), शनिवार दि. ८ रोजी ह.भ.प. संजय महाराज धोंगडे (राहुरी), रविवार दि. ९ रोजी ह.भ.प. कानिफनाथ महाराज आगम (जेऊर) तर सोमवार दि. १० रोजी ह.भ.प. बबन महाराज विंचू (करमाळा) यांचे कीर्तन होणार आहे.

मंगळवार दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. बळीराम महाराज वायकर (पाडळी) यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होईल. त्यानंतर कै. अजिनाथ रंगनाथ गाठे यांच्या स्मरणार्थ गाठे परिवाराचे प्रशांत गाठे आणि प्रवीण गाठे यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच सौ. पुष्पा व श्री. कैलास वादवणे यांच्या वतीने शिंपी समाजातील कष्टाळू व होतकरू महिलांचा सन्मान यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती शिंपी समाज पंच वाडा करमाळा चे सचिव पांडुरंग वडे यांनी दिली आहे.

या सप्ताहात विविध भजनी मंडळे व भाविकांचा सहभाग राहणार आहे. या धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहरातील शिंपी समाज बांधवांकडून करण्यात आले आहे.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!