September 4, 2026
IMG-20260817-WA0024(1)

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल , ट्विंकलिंग स्टार्स व श्री गिरधरदास देवी विद्यालय मध्ये स्वातंत्र्याचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री कन्हैयालाल देवी सर शाळेच्या सर्वेसर्वा सौ सुनीता देवी मॅडम यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री गणेश जी करे पाटील सर श्री चुंबळकर सर उपस्थित होते सर्वप्रथम प्रतिमा पूजन केले गेले. त्यानंतर संस्थेचे संचालक श्री विजयकुमार दोशी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी झेंड्याला सलामी देत मार्च पास केले.

नर्सरी, एलकेजी ,युकेजी मधील छोटी चिमुकली मुले चाचा नेहरू लोकमान्य टिळक झाशीची राणी, भारत माता, भगतसिंग अशा विविध पोशाखामध्ये खूपच साजरी दिसत होती. इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर डंबेल्स कवायत सादर केली. देशभक्तीपर गीतावर नृत्य स्वराज गायकवाड व समर्थ गायकवाड या बंधूंनी सादर केले तसेच लेझीम सादर झाले त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री कन्हैयालालजी देवी, शाळेच्या सर्वेसर्वा सुनिता देवी मॅडम , संचालक विजयकुमार दोशी , अमोद संचेती , नवभारत स्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर मॅडम, गिरधरदास देवी विद्यालय चे मुख्याध्यापक संभाजी जगताप सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रम प्रसंगी. सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग ही या ठिकाणी उपस्थित होते.

एकंदरीत कार्यक्रम प्रसंगी उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. नवभारत स्कूल मधील विद्यार्थ्यांना गायत्री राठोड यांच्यामार्फत बिस्किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वाती काळे मॅडम, मेघाली शेटे मॅडम ,सुहास गलांडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन नागनाथ बोळगे सर यांनी केले.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!