September 4, 2026
IMG-20260817-WA0031(1)

करमाळा, प्रतिनिधी – ॲग्री सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने टेंभुर्णी येथे महाराष्ट्रातील केळी बागायतदार शेतकऱ्यांचा मेळावा केळी तंत्र पुष्प 2026 हा आयोजित करण्यात आलेला होता. या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील केळी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते मिंगल केळीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गुळसडी येथील डॉक्टर विजय बागल यांनी केळी पिकाच्या उत्पादनवाढ, गुणवत्तावाढ व निर्यातक्षम दर्जा प्राप्त करण्यासाठी केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब तसेच केळी पिकाच्या एस ओ पी चे यशस्वी पालन करून आपल्या परिसरात एक आदर्श व प्रगतिशील केळी बागायतदार म्हणून उल्लेखनीय स्थान निर्माण केल्याबद्दल मिंगल केळी रत्न हा सन्मान प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय केळी संशोधन संस्था त्रिची तामिळनाडू येथील केळी संशोधक शास्त्रज्ञ डॉ.व्ही कुमार ,डॉ.बर्लिनर, एक्सपोर्ट तज्ञ डॉ.अजहर पठाण, ॲग्री सर्च इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रदीप कोठावदे, केळी तज्ञ शरद विसपुते, मनोज शहा, राहुल पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. विजय बागल यांनी या पुरस्कारानंतर आपल्या परिसरामध्ये युरोपसाठी निर्यातक्षम केळी चा दर्जा निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण स्वतः प्रयत्न करणार असून आपल्या परिसरातील शेतकऱ्यांनाही याविषयी जागृत करण्यात करणार असल्याचे सांगितले.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!