करमाळा, प्रतिनिधी – शहरातील दत्तपेठ तरुण मंडळाच्या गणेशोत्सव कार्यकारणीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत शहरातील सुप्रसिद्ध किराणा व्यापारी तसेच पत्रकार रितेश कटारिया यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
करमाळा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती विक्रमसिंह परदेशी, अमोल परदेशी अभय महाजन, संग्राम देशमुख, अरुण टांगडे विश्वजीत परदेशी, प्रदीप देवी, संकेत खाटेर आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत उपाध्यक्षपदी सुंदर महामुनी आणि नितेश देवी, खजिनदार पदी हर्ष घोडेगावकर, कार्याध्यक्षपदी भणगे, मिरवणूक प्रमुखपदी मनोज भणगे यांची निवड करण्यात आली.
दत्तपेठ तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेले रितेश कटारिया यांचा मंडळांच्या वतीने वर्षभर राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग असतो. त्यांच्या या सहभागाची दखल घेत दत्तपेठ तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवा दरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबवून तसेच महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करून आणि गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत काढून दत्तपेठ तरुण मंडळाची परंपरा कायम राखणार असल्याचे यावेळी नूतन अध्यक्ष रितेश कटारिया यांनी सांगितले.
या बैठकीला शिवम टांगडे, धनराज महाजन, अजिंक्य महाजन यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. दत्तपेठ तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कटारिया यांचे व्यापारी वर्गासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
.
.
.