करमाळा, प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत सिद्धी देशमुख हिने प्रथम क्रमांक, अंश राठोड याने प्रथम क्रमांक, तर दुर्वा नवले हिने द्वितीय क्रमांक मिळविला. या यशामुळे तिन्ही खेळाडूंची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडूंना श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कन्हैयालालजी देवी, विश्वस्त सौ. सुनिता देवी, मुख्याध्यापिका अश्विनी देशमाने तसेच पालक पृथ्वीराज देशमुख सर, तेजश्री देशमुख मॅडम आणि क्रीडाशिक्षक बोळगे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

.

.

