September 19, 2026
IMG-20260914-WA0044

गौरी-गणपती सजावट स्पर्धेचेही आयोजन

करमाळा, प्रतिनिधी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील सरकार मित्र मंडळाच्या वतीने दि.२२ ते २४ सप्टेंबर असे तीन दिवस सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना सालाबाद प्रमाणे लकी ड्रॉ द्वारे ५१ पैठणी भेट देण्यात येणार असल्याची माहिती सरकार मित्रमंडळाचे अध्यक्ष विश्वजीत परदेशी यांनी दिली आहे.

दि.२२ ते २४ सप्टेंबर दरम्यान शहरातील जय महाराष्ट्र चौक येथे सकाळी ६ वाजता सामूहिक अथर्वशीर्ष पठणाला सुरुवात होणार आहे. मंडळाच्या या उपक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या दरवर्षी वाढतच जात असून यावर्षी तब्बल एक हजार महिला भगिनींना सहभागी करून घेण्याचा भव्य संकल्प मंडळाने केला आहे.

सामूहिक अथर्वशीर्ष पठणासोबतच गौरी गणपतीच्या निमित्ताने घरगुती गौराई सजावट स्पर्धेचेही सरकार मित्रमंडळाकडून आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास एलसीडी टीव्ही, द्वितीय क्रमांकास आटा चक्की, तृतीय क्रमांकास ओव्हन तर उत्तेजनार्थ इलेक्ट्रिक शेगडी पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे.

ऑनलाइन पद्धतीने ही स्पर्धा होणार असून स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी घरातील गौरी गणपती आरासाचा ३० सेकंदांचा व्हिडिओ सौ. वीणाभाभी देवी (मो.क्र.9763627335), सौ. नीलिमा पुंडे (मो.क्र. 9860733922), सौ. रेश्मा कदम (मो.क्र. 8369983890) किंवा सौ. मंजिरी जोशी (मो. 9689690715) यांपैकी कोणत्याही एकाच क्रमांकावर स्पर्धकाचे नाव आणि पत्त्यासह शनीवार दि.१९ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाठवायचा आहे.

या भक्तिमय उपक्रमात आणि सजावट स्पर्धेत करमाळा शहरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सरकार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!