September 11, 2026
IMG-20260911-WA0032

करमाळा, प्रतिनिधी — श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्समध्ये ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मा. श्री. गणेशजी करे पाटील सर होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सौ. नंदिनी शहा उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक, क्लार्क व शिपाई यांच्या भूमिका साकारत वर्ग व्यवस्थापनाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी भाषणे व नृत्य सादर करून शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. शाळेच्या सर्वेसर्वा सुनिता देवी मॅडम यांनी सर्व स्टाफला भेटवस्तू दिल्या. तसेच विद्यार्थिनी लीला गणेश करे हिनेही सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन आपला आदर व्यक्त केला.

मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर मॅडम यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकत सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी केले.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!