करमाळा (केतूर प्रतिनिधी रवी चव्हाण) – तालुक्यातील जिंती केंद्रातील कोंढारचिंचोली जिल्हा परिषद शाळेत गुरुवार दि.२४ सप्टेंबर रोजी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेच्या आवारातील नारळाच्या झाडांचे शहाळे (नारळ) शाळेतील ११६ विद्यार्थी-विद्यार्थिनींना वाटण्यात आले.

जिल्हा परिषद शाळा कोंढारचिंचोली ही सोलापूर जिल्ह्यासह करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील नामवंत व आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. शाळेच्या विविध उपक्रमांमुळे शाळेचा नावलौकिक वाढला आहे. अशातच शाळेच्या आवारातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उपयोग करण्याच्या हेतूने झाडांवरील शहाळे विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम राबविला गेला.

यावेळी मुख्याध्यापक एस. डी. शिंदे, सहशिक्षक शहाजी देवकुते, विठ्ठल इवरे, नवले सर, गिरंजे मॅडम, बारवकर सर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती तसेच कोंढारचिंचोली ग्रामस्थ उपस्थित होते. उपक्रमाच्या आयोजनाबद्दल कोंढारचिंचोली ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समितीने सर्व शिक्षकांचे आभार मानले.

.

.

.

