गुळसडी, पांडे परिसरातील चारींचा घेतला आढावा; पाण्याच्या विसर्ग व आवर्तन नियोजनाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा
करमाळा, प्रतिनिधी : पावसाने दडी मारल्याने पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी दहिगाव उपसा सिंचन योजना महत्त्वाची ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नारायण आबा पाटील यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाची प्रत्यक्ष पाहणी करून गुळसडी येथील यादव तलाव तसेच पांडे परिसरातील चारींचा आढावा घेतला.

यावेळी आमदार पाटील यांनी पाण्याचा विसर्ग, आवर्तनाचे नियोजन आणि संबंधित भागातील पाणीपुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व पाण्याची गरज जाणून घेतली.

आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यांपासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू असल्याचे सांगण्यात आले. यामुळे पूर्व भागातील अनेक गावांमधील उभ्या पिकांना पाणी मिळण्यास मदत झाली असून, काही ठिकाणी जनावरांच्या चारा व पाण्याचीही सोय झाली आहे. तसेच विविध गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना ज्या तलावांवर अवलंबून आहेत, त्या तलावांमध्येही पाणी सोडण्याचे काम सुरू आहे.

पाहणी दौऱ्यावेळी शिवाजी पाटील, माऊली कळसे, महावीर कळसे, समाधान यादव, भाऊ भोसले, भाऊ भंडारे, धनंजय भंडारे, बाळू शियाळ, राजू शेख, बाबू शेख, अशोक गाडे, जगदीश गायकवाड, प्रताप बागल, नितीन भंडारे, कल्याण निकम, महादेव क्षीरसागर, शेलगाव (क.) येथील आत्माराम वीर, संदीप पाटील, शिंदे गुरुजी, पांडे येथील गहिनीनाथ दुधे, माजी सरपंच अनारसे, वरकटणे येथील जगन्नाथ मस्कर तसेच कनिष्ठ अभियंता विलास देवकाते, कौस्तुभ सौंदणे आदी उपस्थित होते.

यावेळी गुळसडी ग्रामस्थांच्या वतीने आमदार नारायण आबा पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

.

.

