March 1, 2026
IMG-20251115-WA0018

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय सोलापूर इंटेसीफाइड अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रमोद खोबरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी माहिती देताना यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक स्वच्छता तसेच कोणताही आजार होऊच नये, यासाठी घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन केले. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये वैयक्तिक गोष्टींकडे सुद्धा किती लक्ष दिले पाहिजे याविषयी ही त्यांनी सांगितले. एड्स म्हणजे काय आणि तो होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याविषयी त्यांनी मुलांना सांगितले.

या वेळी शाळेच्या संचालिका सौ. सुनीता देवी, मुख्याध्यापिका सौ. अश्विनी क्षीरसागर यांच्यासह इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *