October 27, 2026
IMG-20261027-WA0007

करमाळा – अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची नुकतीच निवड झाली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिवंशसिंह यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष पंकजसिंह ठाकुर यांनी ठाकूर यांची निवड जाहीर केली आहे.

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेची स्थापना १८९७ साली झालेली आहे. क्षत्रिय समाजाच्या न्याय व हक्कांसाठी ही संघटना कार्य करते. या संघटनेचा विस्तार संपूर्ण भारतभर असून संघटना सर्व राज्यामध्ये कार्यरत आहे. नरेंद्रसिंह ठाकुर यांनी युवा राजपुताना संघटन या संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून करमाळा शहर व तालुक्यातील क्षत्रिय समाजाच्या न्याय व हक्कांसाठी कार्य करत सोलापूर जिल्ह्यातही संघटनेची पाळेमुळे रोवली आहेत. याशिवाय संजय गांधी निराधार योजना तसेच विधी सेवा समिती या समितीच्या सदस्यपदी उत्तम कामगिरी पार पाडली आहे. भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस तसेच किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. अयोध्या येथील सैन्य शहीद स्मारक ट्रस्ट या संस्थेचे सहसचिव म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे. डिजिटल मीडिया तालुका सचिव या बरोबरच सामाजिक चळवळीत काम करत असताना विविध आंदोलनामध्ये सहभाग घेऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमी त्यांनी आवाज उठवला आहे. ठाकूर यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे.

क्षत्रिय समाजाबरोबरच समाजातील उपेक्षित घटकांना शासनाच्या विविध योजना, शिक्षा, संस्कृती, रोजगार या विषयांना प्राधान्य देण्याचा मनोदय ठाकूर यांनी निवडीनंतर व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीचे विविध स्तरातून स्वागत होत आहे. लवकरच जिल्ह्यामध्ये प्रवास करून जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही ठाकूर यांनी यावेळी दिली आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!