करमाळा, प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने १ ऑक्टोबर २०२५ रोजी “वंदे मातरम” या राष्ट्रीय गीताच्या दीडशे वर्षानिमित्त देशभरात उत्सव साजरा करण्यास मान्यता दिली आहे. यानुसार शहरातील श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये या राष्ट्रव्यापी स्मरणोत्त्सवाचा औपचारिक प्रारंभ उत्साहात करण्यात आला.
७ नोव्हेंबर १८७५ रोजी बंकिम चंद्र चटर्जी यांनी रचलेल्या “वंदे मातरम” या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर ७ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२६ हे वर्ष राष्ट्रव्यापी स्मरणोत्त्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये शाळेच्या संचालिका सौ. सुनिता देवी यांच्या पुढाकाराने शुक्रवार दि. ७ रोजी या स्मरणोत्सवाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना जागृत करणाऱ्या वंदे मातरम या गीताचे शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सामुदायिक गायन केले.
“वंदे मातरम” हे गीत देशभक्ती, कृतज्ञता, राष्ट्र अभिमान, आदर, एकात्मता या भावनेने सर्वांना एकत्र बांधून ठेवते. शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये ही भावना विकसित करण्यासाठी नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये सामूहिकरीत्या “वंदे मातरम”चे गायन घेण्यात आल्याचे सौ. देवी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्री गिरीधरदास देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद
आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
. 
.

.
.
