विद्या विकास मंडळाच्या वतीने अभिनंदन…
करमाळा, प्रतिनिधी – येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा खेळाडू शुभम राजेंद्र चिखले याने १९ वर्ष वयोगट मुलांमध्ये विभागातून प्रथम क्रमांकाने विजय प्राप्त केला आहे. यामुळे शुभमची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

शुभमने दि.०९/१२/२०२५ रोजी पुणे येथे झालेल्या शालेय विभागीय स्तरीय आर्चरी स्पर्धेत पहिल्या फेरीत ७० मीटरचे दोन अंतरात ३३१ व दुसऱ्या फेरीत ३२७ असे एकूण ६५८ गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे. या कामगिरीमुळे त्याची १७ व २० डिसेंबर रोजी अमरावती येथील जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यासाठी शुभमला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.रामकुमार काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

शुभमच्या या यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, उपप्राचार्य अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

.

.

