June 12, 2026
अल्पवयीन मुलीचा विनयभंग

करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी – शेतातील काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाची गळ घालून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा ते जेऊर मार्गावरील पश्चिम बाजूस असलेल्या एका गावात हा प्रकार घडला आहे.

याबाबत ३४ वर्षीय फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२७/०५/२६ रोजी ५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची अल्पवयीन नातलग निर्भया (बदललेले नाव) ही त्यांच्या शेतात गवत आणण्यासाठी गेली असताना शेजारी राहणाऱ्या एकाने निर्भयाच्या जवळ जाऊन ‘तु मला खुप आवडतेस, तु माझे सोबत लग्न कर’ असे म्हणुन तिच्या बाल मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. सदर आरोपी हा निर्भया हिला अधुन-मधुन पाहुन तिला मानेने व हाताने वाईट हेतुने इशारे करत असल्याचे तसेच दि.२३/०४/२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ती (निर्भया) शाळेतुन घरी येत असताना सुध्दा आरोपीने तिला ‘गाडीवर बस, तुला मी घरी सोडतो, तुला काय पैसे लागले तर सांग मी देतो, परंतु तु माझ्या सोबत लग्न कर’, असे म्हणुन तिच्या बाल मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. यावेळी निर्भया हिने त्याला विरोध केला असता आरोपीने तिला ‘तुला व तुझ्या घरच्या लोकांना जिवंत ठेवणार नाही’,अशी धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.

या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी सदर आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहीता २०२३ च्या विविध कलमांसह बाल लैंगिक संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. स.पो.नि. राजेंद्र ढोरे हे या गुन्हयाचा अधिक तपास करत आहेत.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!