रोख रकमेसह ९० हजारांचा ऐवज लंपास
करमाळा, प्रतिनिधी – शहरातील फिरंगाई नगर येथील बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज चोरीची घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा दिवसाढवळ्या घरफोडी ची घटना घडली आहे.

याबाबत शहरातील सिद्धार्थनगर येथील सुनिल रंगनाथ गोरे यांनी दि.०२/०४/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ०१/०४/२६ रोजी दुपारी साडेबारा ते चार वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या सिद्धार्थ नगर येथील राहत्या घराच्या पाठीमागील दरवाजा फाकवून व आतील कडी-कोयंडा तोडून अज्ञात आरोपीने रु. ७५,००० किंमतीच्या सोन्याच्या अंगठी सह रोख रक्कम रु.१५,००० असा ९०,००० रु. किंमतीचा ऐवजी चोरून नेला आहे.

गोरे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(अ), ३३१(३) प्रमाणे गुन्हा नोंद केला असून पो.ना. शेख हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

