करमाळा, प्रतिनिधी – तालूक्यातील मंगल कार्यालय असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची वार्षिक बैठक नुकतीच पार पडली. यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षपदी विलासराव घुमरे, उपाध्यक्षपदी विनोद चव्हाण तर सचिवपदी बाळासाहेब होसिंग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

करमाळा शहरा नजीकच्या पांडे येथील कमलाई मंगल कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या बैठकीमध्ये करमाळा तालूका मंगल कार्यालय असोसिएशनच्या अध्यक्षपदी शहरातील विकी मंगल कार्यालयाचे विलासराव घुमरे यांची अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी चिखलठाण येथील श्रीनाथ मंगल कार्यालयाचे विनोद चव्हाण तर सचिवपदी पोथरे येथील आनंदी मंगल कार्यालयाचे बाळासाहेब होसिंग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी कार्यालय मालक जयराम सोरटे, भाऊराव कदम, प्रमोद जानकर, अनिल कादगे, दत्ता भुजबळ, तानाजी महामुनी, प्रवीण चांदगुडे, स्वप्नील सालगुडे, कुमार कदगे, संदीप बोकन, संदीप रोडगे, मोहन टिकोरे, मोहसीन नालबंद, देवकर भाऊसाहेब, विनोद शिंदे, महेश सुर्यपुजारी, दिगंबर झोळ आदी सदस्य उपस्थित होते.

.

.

.

