April 11, 2026
IMG-20260118-WA0018(1)

करमाळा, प्रतिनिधी – महापुरुषांचा पुतळा उभारण्यासाठी प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असताना गेल्या महिन्यात करमाळा तालुक्यातील पुनवर येथे अनाधिकृत रित्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. आता याप्रकरणी बाळराजे आवारे पाटील यांच्यासह ११ जणांविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पुनवर ग्रा.पं.चे ग्रामविकास अधिकारी प्रदिप मधुकर मोकाशी यांनी दि.०५/०४/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १०/०३/२६ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या पुर्वी सुरज कैलास शेळके, किरण भिमराव नरसाळे, अशोक सुभाष नरसाळे, राजेश नानासाहेब ननवरे, भाऊ अर्जुन नरसाळे, मयुर मच्छिंद्र सावंत, अविनाश कांतीलाल शेलार, ऋषीकेश बाळु नरसाळे, शांतिलाल प्रकाश शेळके, बळीराम हनुमंत नरसाळे (सर्व रा. पुनवर ता. करमाळा) तसेच बाळराजे आवारे पाटील (रा. महाकाळा ता. अंबड जि. जालना) यांनी संगनमत करुन, शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर जमाव जमवुन, अनाधिकृत रित्या पुनवर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविलेला आहे. 

मोकाशी यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी वरील अकरा जणांविरुद्ध भा.न्या.सं. २०२३ च्या कलम २२३,१८९ (२) व प्राचीन संस्मारके संरक्षण अधिनियम १९०४ च्या कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पो.हे.काँ. दिपक घोरपडे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *