April 13, 2026
IMG-20260323-WA0018

दगडाने डोळ्यावर मारुन केले जखमी

करमाळा, प्रतिनिधी – शेजारी राहत असलेल्या भावाने सुन मारत असल्याचे सांगितल्याने भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या चुलत सासऱ्यालाही या डॅशींग सुनेने जखमी केले आहे. तालुक्यातील सावडी येथे ही घटना घडली आहे.

याबाबत सावडी येथील रामदास बाबुराव काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१८/०३/२६ रोजी सायंकाळी त्यांचे शेजारील भाऊ कालिदास बाबुराव काकडे व त्यांची सुन मोनिका भाऊ काकडे यांच्यात घरगुती कारणावरुन वाद चालु होता. तेव्हा भाऊ कालिदास यांनी फिर्यादी रामदास यांना हाक मारुन सुन मोनिका ही मारहाण करत असल्याचे सांगितले. त्यामुळे रामदास हे त्यांची भांडणे सोडविण्यासाठी तेथे गेले. तेव्हा कालिदास यांची सुन मोनिका हीने फिर्यादी रामदास यांना मध्ये यायचे नाही, असे म्हणुन शिवीगाळी, दमदाटी करत रामदास यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर दगडाने मारुन जखमी केले. त्यानंतर तीने रामदास यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ चावून जखमी केले आहे. फिर्यादी रामदास जखमी झाल्याचे पाहुन त्याचे चुलत भाऊ बाळकृष्ण ज्ञानदेव काकडे, पुतण्या महेश संजय काकडे, निखिल राजेंद्र काकडे यांनी रामदास यांना चुलत सुनेच्या तावडीतून सोडविले.

रामदास काकडे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी मोनिका भाऊ काकडे (रा. सावडी ता. करमाळा) हिच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *