करमाळा, प्रतिनिधी – सामायिक जागा मोजून घेण्याबाबत मोबाईलवर संभाषण सुरू असताना महीलेविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या एकावर करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पीडित महिलेने दि.२६/०३/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ती तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात राहते. फिर्यादी आणि दौंड येथील यदुनाथ हरिदास शिंदे यांच्यात त्यांच्या गावामध्ये सामायिक जागा आहे. ही जागा मोजून घेण्याविषयी पीडित महिलेचा पती आणि शिंदे यांच्यात मोबाईलवर स्पीकर चालू ठेवून संभाषण सुरू होते. यावेळी संशयित आरोपी शिंदे याने मोबाईल वरून तिच्या पतीसह पीडीते विषयी अपमान कारक शब्द वापरून पीडीतेला शिवीगाळ व दमदाटी करून पीडितेच्या विनयशीलतेचा तसेच लज्जेचा अपमान करण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारले.

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी यदुनाथ हरिदास शिंदे (रा. दौंड) याच्यावर भारतीय न्याय संहिता (२०२३) च्या कलम ७९, ३५१ (२) आणि ३५२ नुसार गुन्हा नोंद केला आहे. पो.हे.कॉ. आप्पासाहेब लोहार हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

.

.

.

.

