April 13, 2026
IMG-20260322-WA0052

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा शहर व तालुक्यामध्ये गुढीपाडवा आणि ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त शहरासह ग्रामीण भागात परंपरागत गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले तर ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून ईद निमित्त सर्वधर्मीय आप्तेष्टांना घरी बोलावून शिरकुर्म्याचा पाहुणचार दिला.

गुरुवार दि. १९ रोजी गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षानिमित्त तालुक्याचे ग्रामदैवत श्री कमलादेवी मंदिरात देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहन पाटील यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा करून गुढी उभारण्यात आली. यासोबतच शहर व तालुक्यात घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. गुढीपाडव्यानिमित्त श्री कमलादेवी मंदिरात दिवसभर भक्तांची मांदियाळी दिसून आली.

शनिवार दि.२१ रोजी सकाळी करमाळा शहरातील मौलालीचा माळ येथील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने करमाळा ग्रामीण व शहरी भागातुन मुस्लिम बांधवांनी हजेरी लावत सामुहिक नमाज पठण केले. यावेळी मौलाना मुश्ताक नीसार काझी आणि मुजाहिद मोहम्मद खलील काझी यांनी खुदबा पठण केले. यानंतर बांगलादेशात हिंदु बांधवांवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यात आला. द्वेष भावनेन देश चालणार नाही हे सर्वांनी समजुन घेत एकता आपल्या देशाची मोठी ताकत असल्याचे प्रतिपादन शहर काझी यांनी यावेळी केले.

सामाजिक सलोख्याची परंपरा असलेल्या करमाळा शहर व तालुक्यात एकमेकांना शुभेच्छा देत हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले तर ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी आपले आप्तेष्ट आणि नातेवाईकांना ईद निमित्त घरी बोलावून शीरकुर्म्याचे वाटप केले. एकूणच हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा आणि त्याग आणि संयमाचे प्रतीक असलेला मुस्लिम धर्मीयांचा रमजान ईद हे सण करमाळा शहरात खेळीमेळीच्या वातावरणात साजरे करण्यात आले.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *