करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील जेऊर येथे संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये भगवान महावीर जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय मा.कार्यअध्यक्ष नितीन खटके जैन परंपरेतील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म इ.स.पूर्व 599 मध्ये कुंडग्राम येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते. ते एक राजपुत्र होते. मात्र, वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी संसाराचा त्याग करून कठोर तपश्चर्या केली.

सुमारे 12 वर्षांच्या साधनेनंतर त्यांना कैवल्य ज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण जीवन लोकांना सत्य आणि अहिंसेचा संदेश देण्यात घालवले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त साजरी केली जाणारी महावीर जयंती हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे.चला, महावीर जयंतीनिमित्त त्यांचा विचार अधिकाकाधिक लोकांपर्यंत पोहोचवूया आणि आपसांत शांती, प्रेम-बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करूया.अहिंसेचे पालन करणे हाच खरा धर्म आहे.’

सर्वांनी अहिंसेचे पालन केल्यास कुणीही कुणाचा द्वेश करणार नाही; घरात किंवा घराबाहेर कुणावरही हिंसा होणार नाही; जगात कधीही युद्ध होणार नाही. संपूर्ण मानवजात एकमेकांशी आनंदाने व गुण्यागोविंदाने नांदेल.समताः महावीरांची शिकवण समतेवर आधारीत होती. जातीभेद, धर्मभेद आणि स्त्री-पुरुष भेद नाकारून त्यांनी सर्वांना समतेची शिकवण दिली. स्वतःतील अहंभाव बाजुला सारून सर्वांना ‘माणुस’ बनण्यास सांगितले. भगवान महावीरांनी सत्य बोलण्याचा आग्रह केला व खोटेपणाला दूर सारले.

सर्वांनी याचे पालन केल्यास कुठेही ‘अफवा’ पसरून अनुचित घटना घडणार नाही; कुणीही कुणाचा विश्वासघात करणार नाही; माणूस एकमेकांवर सहजतेने विश्वास ठेवतील.अस्तेयः कुणीही चोरी करू नये, परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीचे काहीही घेऊ नये.
सर्वांनी याचे पालन केल्यास शेतकरी-शेतमजूर, कष्टकरी कामगार, गोरगरीबांचे हक्क कुणीही हिसकावून घेणार नाही. प्रत्येकाला सन्मानाने आणि ताठ मानेने जगता येईल.महावीरांनी सांगितले की, सत्य समजण्यासाठी विविध दृष्टिकोणांचा स्विकार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आदरभाव-सहिष्णूता वाढते. हा विचार आपल्याला दुसऱ्याचे मत ऐकून घेण्याची शिकवण देते. सर्वांनी याचे पालन केल्यास लोक एकमेकांच्या बोलण्याचा आदर करतील.

‘मी बोलतो तेच सत्य’ असे कुणीही म्हणणार नाही. त्यामुळे लोकांमध्ये वाद होणार नाही. सर्वजण एकमेकांशी आदराने वागतील. चहुबाजुला शांती आणि बंधुभाव नांदेल. यावेळी उपस्थित नितीन खटके, निलेश पाटील, अतुल निर्मळ, हेमंत शिंदे, अजित उपाध्ये, सोमनाथ जाधव, धन्यकुमार गारुडी,उमेश मोहिते, आदिनाथ माने, किशोर कदम, सागर साखरे, इत्यादी उपस्थित होते.

.

.

.

